राज्यातील कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण
शेतक-यांना उपलब्ध होणा-या निविष्ठा योग्य दर्जाच्या असणे उत्पादन वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. निविष्ठांचे उत्पादन, साठवण, पुरवठा, विक्री इत्यादिंचे नियमन करण्यासाठी केंद्र शासनाने विविध कायदे संमत केलेले आहेत. त्यामध्ये कीटकनाशकांच्या गुणवत्तेसाठी कीटनाशके कायदा 1968 व नियम 1971 हे कायदे अस्तित्वात आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणी करिता कीटकनाशकांची गुणवत्ता तपासणी वेगवेगळ्या स्तरावर आवश्यक ठरवलेली आहे. त्यासाठी संबंधीत काटद्यांतर्गत प्रयोगशाळा स्थापित करण्यात आलेल्या आहेत.
राज्यामध्ये कीटकनाशके तपासणीसाठी पुणे, ठाणे, औरंगाबाद व अमरावती या ठिकाणी कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा स्थापित करण्यात आलेल्या आहेत. या सर्व कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळांमध्ये जैविक कीडनाशके तपासणीच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा-
राज्यात कीटनाशके तपासणी प्रयोगशाळा पुणे, ठाणे, औरंगाबाद आणि अमरावती येथे कार्यान्वीत आहेत. सदर प्रयोगशाळांचा स्थापनेचा व प्रयोगशाळांना जोडलेल्या जिल्ह्याबाबतचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
अ. क्र. |
कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा |
स्थापनेचे वर्ष |
प्रयोगशाळेचे नांव व पत्ता व दूरध्वनी क्रमांक |
क्षमता |
जिल्हे |
एन.ए.बी.एल. मानांकन |
1 |
पुणे |
1972-73 |
कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा पुणे, कृषिभवन, शिवाजीनगर, पुणे-411005, दू.क्र.020-25510300 |
2210 |
पुणे, अ.नगर, सोलापूर, सिंधुदूर्ग,कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, जळगांव, |
प्राप्त |
2 |
ठाणे |
1981-82 |
कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा ठाणे, वागळे इस्टेट, सेक्टर नं-16, ठाणे-32, दू.क्र.022-25821137 |
1130 |
ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार |
प्राप्त |
3 |
औरंगाबाद |
1981-82 |
कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा औरंगाबाद, शाहूरमियाँ दर्गारोड, औ.बाद. दू.क्र.0240-2334851 |
1130 |
औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, |
प्राप्त |
4 |
अमरावती |
1980-81 |
कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा अमरावती, तपोवन रोड, कॅम्प, अमरावती- 444603 दू.क्र.0721-2662102 |
1130 |
अमरावती,यवतमाळ, नागपूर,वर्धा,भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. |
प्राप्त |
एकूण |
5600 |
|
|
वरील प्रयोगशाळेत कीटकनाशकांची गुणवत्ता तपासण्यात येऊन ती कीटकनाशके प्रमाणकानुसार आहेत किंवा नाहीत याचीही खात्री करण्यात येते, सदर प्रयोगशाळेत शेतकरी, नागरीक अथवा सरकारी, निमसरकारी संस्था, सहकारी संस्था यांचेकडील किटनाशकांचे नमूने सदर प्रयोगशाळेत तपासून घेऊ शकतात.
कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळेमध्ये खालील प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात.
- अँक्टीव्ह इनग्रेडीयंट.
- अँसीडीटी / अल्कलीनीटी.
- सिव्ह टेस्ट, पार्टीकल साईज.
- इमल्शन स्टॅबिलीटी, ससेप्टीब्लीटी
- कोल्ड टेस्ट, फ्लॅश पॉईंट.
- बल्क डेन्सिटी.
- वॉटर रन ऑफ.
- अँटीशन टेस्ट.
- मॉइश्चर टेस्ट.
- फायटोटॉक्सीसीटी इ.
सदरच्या तापासण्या व्हाल्युमेट्रीक व ईन्स्ट्रुमेंटल (Instrumental) पद्धतीने केल्या जातात. त्याकरीता तपासणी शुल्क अनुक्रमे रु. 500/- व 1000/- (अधिक सेवा कर) मात्र आकारण्यात येते. मागिल 7 वर्षात तपासलेल्या नमुन्यांचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
1/ 2008-2009/ 5000/ 4446/ 4138/ 89/ 2.15/ 2/ 2009-2010/ 5000/ 4751/ 4618/ 353/ 7.64/ 3/ 2010-2011/ 3950/ 4903/ 4811/ 241/ 5.01/ 4/ 2011-2012/ 5600/ 5834/ 5614/ 325/ 5.79/ 5/ 2012-2013/ 5600/ 6286/ 5827/ 393/ 6.74/ 6/ 2013-2014/ 5600/ 6566/ 6030/ 282/ 4.68/ 7/ 2014-2015/ 5600/ 6101/ 5745/ 316/ 5.51/
अ.क्र/ |
वर्ष/ |
वार्षिक तपासणी क्षमता/ |
|
प्राप्त नमूने/ |
|
तपासलेले नमूने/ |
|
अप्रमाणित नमूने/ |
|
अप्रमाणित नमून्यांचे प्रमाण/ |
|
प्रयोगशाळा निहाय झालेल्या सन 2014-15 खर्चाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र. |
प्रयोगशाळेचे नांव |
साध्य(रक्कम रु. लाखात) |
1 |
कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा, पुणे |
12.25 |
2 |
कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा, ठाणे |
12.25 |
3 |
कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा, औरंगाबाद |
9.13 |
4 |
कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा, अमरावती |
21.19 |
5 |
आयुक्तालयस्तर |
45.18 |
एकूण |
100.00 |
|
योजनांतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातुन प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यात आल्यामुळे खालीलप्रमाणे प्रयोगशाळेत कार्यवाही करणे शक्य झालेले आहे.
- प्रयोगशाळेतील एकूण 23 विश्लेषकांपैकी 8 पदे कमी (35 टक्के) होऊनही प्रयोगशाळेची विश्लेषण क्षमतेत वाढ.
- चार प्रयोगशाळांना एन. ए. बी. एल. (आय.एस.ओ 17025/2005) चे मानांकन प्राप्त झाले आहे.
- नमुने शिघ्रतेने तपासणी करणे शक्य
- प्रयोगशाळेत जैविक किटनाशके तपासणी सुविधांची निर्मीती.
- संगणकिय प्रणाली विकसीत व कार्यान्वित.
- आधुनिक उपकरणांमुळे तपासणीतील अचूकतेत वाढ.
- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विश्लेषण अहवालासोबत क्रोमॅटोग्राफ देणे शक्य.
पुढील तीन वर्षाचे नियोजन.
- गुणवत्ता नियंत्रणासाठी तपासणी करीता येणारे नमून्य़ाची माहीती जलद गतीने संबंधीत निरीक्षकांना व विक्रेत्यांना उपलब्ध होण्यासाठी अद्यावत संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली असून कीटकनाशकांच्या नमुन्यांचा निष्कर्ष ऑन लाईन करण्यात येणार आहे.