शेतीनिष्ठ

हा पुरस्कार सन १९६७ सालापासुन दिला जातो. शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये सुधारीत शेती औजरांचा वापर, जमिनीच्या प्रतवारीप्रमाणे पिकांची लागवड, जमिनीचे सपाटीकरण, कंटुर पध्दतीने पेरणी, रासायनिक खतांचा सुयोग्य वापर, विहीर / नाला इत्यादीमधील पाणी अडवुन शेतीतील नालाबडींग इत्यादीव्दारे तसेच तुषार व ठिबक सिंचन पध्दतीव्दारे पाण्याचा सुयोग्य वापर, पिक संरक्षक औषधांची वेळेवर फवारणी, शेती पुरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाड, निलगिरी, सुबाभ्‌ुळ इत्यादींची लागवड करणे, स्वतःच्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवड व जवळपास शेतक-­यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे, शासन / सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रक्कमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर व त्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे, इत्यादी निकषांतर्गत शेतीमध्ये शेतक­-यांचे एकंदरीत कार्य विचारात घेऊन राज्य शासनाच्या कृषि विभागाकडून आदिवासी गटासह एकुण २५ (पंचवीस) शेतक­-यांना अथवा संस्थांना शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते व प्रत्येकी रुपये ११,०००/- (रुपये अकरा हजार) रोख रक्कम व स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व त्या व्यक्तिचा सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समिती मार्फत राज्यातुन प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड केलेल्या शेतक­-यास अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो.

सन २०१३ अखेरपर्यत १३२१ शेतकरी निवडण्यात आले

सन-२०११

सर्वसाधारण गट :-

  • श्री. विनायक दत्तात्रय गोगटे मु. कोंढाणे, पो. कोंदीवडे, ता.कर्जत, जि. रायगड .
  • श्री. नित्यानंद विश्राम झगडे, मु. पो. असगोली, ता. गुहागर जि. रत्नागिरी
  • श्री. समाधान दयाराम पाटील मु. उमरे, पो. धुळपिंप्री, ता. एरंडोल, जि. जळगाव
  • डॉ. नरेंद्र रावसाहेब भदाणे मु.पो. सामोडे, ता.साक्री, जि. धुळे
  • श्री. रामचंद्र बाजीराव नागवडे मु.पो.बाभुळसर बु. ता. शिरुर, जि. पुणे
  • श्री. आबासाहेब तुकाराम बंडगर मु.पो. शिरभावी, ता. सांगोला, जि.सोलापूर
  • श्री. प्रकाश दिनकर देसाई मु. चिंचवडे तर्फे कळे, पो. भामटे, ता. करवीर, जि. कोल्हापूर
  • श्री. सुरेश नाभिराज मगदुम मु.पो. कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर
  • श्री. सुरेश ज्ञानदेव चव्हाण मु.पो.हातनूर, ता.तासगांव, जि.सांगली
  • श्री. भालचंद्र लक्ष्मणराव भोजने मु.मार्डी, पो अंबड ता.अंबड, जि.जालना
  • श्री. लक्ष्मण धुराजी पठाडे मु.पो.आडगांव सरक, ता.जि.औरंगाबाद
  • श्री. दत्तात्रय महादेव जाधव मु.पो. उदंडवडगाव, ता. जि. बिड
  • श्री. अजितकुमार उत्तमराव मगर मु. आलापूर पांढरी, पो.असोला, ता.जि.परभणी
  • श्रीमती. लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे मु.पो. उमरा (वाबळे) ता. जि. हिंगोली
  • श्री. सुनिल गुलाबराव महाले मु.पो.वरवट, खंडेराव, ता.संग्रामपूर, जि.बुलढाणा
  • श्री. हिम्मत उर्फ घनःश्याम माणिकराव जोगदंड, पो.आमखेडा, ता.मालेगाव, जि..वाशिम
  • श्री. चिंतामण रामचंद बिसेन मु.पो.हिरडा माली, ता.गोरेगांव, जि.गोंदिया
  • श्री. देवानंद भानुदासजी चौधरी मु.पो.आमगांव (दिघोरी), ता.जि.भंडारा
  • मालू चिन्ना गावडे, मु.पो. पंदेवाही, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली
अधिक