डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे
शासनाचे दि.16 जुलै 2007 च्या शासन निर्णयान्वये कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांच्या खाजगी जमिनीवर डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालण्याची कामे घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे.
जागा निवडीचे निकष-
- उपचार राबविण्यासाठी शेतक-यांची नियमानुसार लेखी संमती असणे आवश्यक आहे.
- हा उपचार पाणलोट क्षेत्रांत राबविण्यांत यावा.
- सलग समपातळी चराची कामे न झालेल्या क्षेत्रात सदरची योजना राबविण्यात यावी.
- या योजनेकरीता डोंगर व टेकडयांच्या उतारावरील ज्या जमीनी वरकस व जास्त उताराच्या आहेत व मजगी किंवा सलग समपातळी चराची कामे करण्यास अयोग्य अशा जमिनी निवडण्यात याव्यात. तसेच ज्या ठिकाणी पुरेसा दगड उपलब्ध आहे अशा जागेची निवड करावी.
- दगडांची बाहेरून वाहतूक करून बांध घालणे ही बाब या उपचारात अजिबात अभिप्रेत नाही.
तांञिक निकष -
या उपचारासाठी तांत्रिक मापदंडाचा तपशील पुढीलप्रमाणे राहील.
उतारगट |
तांत्रिक मापदंड |
|
|
पाया रूंदी मी. |
बांधाची उंची मी. |
माथा रूंदी मी. |
बाजू उतार |
बंाधाचा काटछेद(चौ.मी.) |
बांधाची लांबी मी. |
10 टक्के पर्यंत |
0.75 |
0.60 |
0.45 |
0.25:1 |
0.36 |
740 |
11 ते14 टक्के पर्यंत |
0.75 |
0.60 |
0.45 |
0.25:1 |
0.36 |
800
|
14 टक्के पेक्षाजास्त |
0.75 |
0.60 |
0.45 |
0.25:1 |
0.36 |
870 |
डोंगर उतारावर समपातळीत घालण्यात येणा-या दगडी बांधाचे संकल्पचित्र