मजगी

मजगी

पायऱ्यांची मजगी जमिनीच्या उतारास आडवे कंटुर व टप्प्या टप्प्यांची किंवा पायऱ्यांसारखी अर्धा भाग खोदून व अर्धा भाग भरुन तयार केलेली शेते होय. ज्या ठिकाणी मातीची खोली पुरेशी आहे व पाण्याची सोय उपलब्ध आहे अशा उताराचे मजगीत रुपांतर केले जाते. महाराष्ट्रात अति पावसाच्या प्रदेशात डोंगर उतारावर भात खाचरे तयार करुन भात पिकाखाली जमिन आणण्यात येते.

जागा निवडीचे निकष

  • त्या भागाचे वार्षिक पर्जन्यमान 1000 मि.मी. पेक्षा जास्त असावे.
  • जमिनीचा शेकडा उतार 10 टक्के पेक्षा कमी असावा.
  • काम झाल्यानंतर 15 सें.मी. खोलीची माती शिल्लक राहील इतकी जमिनीची खोली असावी.
  • पावसाचे ताण दिल्यास जवळच्या झ-यातून पाणी वळवून आणून भात पिकास एखादे पाणी देण्याची सोय असावी.
  • कामासाठी पुरेशा प्रमाणात मजूर उलब्ध असावेत.

पायऱ्यांच्या मजगीचे प्रकार-

1. सपाट खाचरांची मजगी-

भात शेतीसाठी शेतीमध्ये सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी साठविणे आवश्यक असते. त्यासाठी जमिनीचा नैसर्गिक उतार बदलून त्याचे रुपांतर सपाट अशा क्षेत्रामध्ये करतात.

2. आतील बाजूस उतार असलेली मजगी-

निलगिरी पर्वतांचे प्रदेशात जेथे बटाटयाची पिके घेतली जातात. त्याठिकाणी याप्रकारचे टेरसिंग करतात. यामध्ये शेतास नैसर्गिक उताराच्या विरुद्ध बाजूस उतार दिला जातो. त्यामुळे जादा पाणी निघून जावून बटाटयासारखी पिके निचरा चांगला असलेल्या जमिनीत उत्तम प्रतिसाद देतात. हिमाचल प्रदेश व हिमालयाच्या उत्तर पुर्व रांगा याठिकाणी सुद्धा या प्रकारची मजगी करतात.

3. बाहेरील बाजूस उतार असलेली मजगी-

जमिनीचा नैसर्गिक अतिउतार कमी करुन शेते तयार केली जातात. शेताचा उतार हा नैसर्गिक उताराच्या दिशेस म्हणजेच बाहेरील बाजूस असतो. कमी पावसाच्या प्रदेशात किंवा जेथे जमिन कमी खोलीची आहे अशा ठिकाणी या प्रकारची मजगी केली जाते.

जमिनीच्या प्रकारानुसार बांधाचा छेद

अ.क्र जमिनीचा प्रकार माथा (मी.) पाया (मी.) उंची (मी.) बाजू उतार छेद (चौ.मी.)
1 उथळ जमीन 25 सें.मी. 0.30 1.50 0.60 1:1 0.54
2 मध्यम जमीन 25 सें.मी. पेक्षा अधिक 0.45 1.80 0.68 1:1 0.7
3 मध्यम 75 सें.मी. 0.45 1.80 0.75 1:20:1 1.00
4 75 सें.मी.पेक्षा अधिक 0.50 2.50 0.80 1:25:1 1.20

मजगी बांधाचे संकल्पचित्र

मजगी बांधाचे संकल्पचित्र