पडकई
शासन निर्णय क्र. नियोजन विभाग क्रमांक/रोहयो 2009/प्र.क्र.50/रोहयो-1, दिनांक- 1 जुलै 2009 अन्वये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरण परिसरात पडकई कार्यक्रम राबविण्यासाठी मान्यता दिली असून शासन निर्णय क्र. जलसं-2013 /प्रक्र-114/जल-7 /दिनांक 10.10.2013 अन्वये आर्थिक मापदंड सुधारित करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने पडकई कार्यक्रमाचे धर्तीवर आदिवासी क्षेत्रांतील आदिवासी शेतक-यांकडे अति उताराच्या जमिनीवर दगडी बांधासह मजगीची कामे हाती घेण्यात येतात.
सर्वसाधारण निकष :-
हा उपचार राबविण्यासाठी शेतकऱ्यांची नियमानुसार शासनाच्या विहित नमुन्यात लेखी संमती घेणे आवश्यक आहे. लाभधारक शेतकऱ्याने समंती दिलेले क्षेत्र भात लागवडी खाली आणणार असलेबाबत त्याने लेखी बंधपत्र देणे आवश्यक आहे.
तांत्रिक मापदंड :-
पडकई कार्यक्रमांतर्गत दगडीबांधासह मजगी कामासाठी खालीलप्रमाणे प्रति हेक्टरी तांत्रिक मापदंड मंजुर असून त्यास अधीन राहून सदर योजना राबविण्यात येते.
अ.क्र. |
तांत्रिक मापदंड |
|
उतारगट
(टक्के) |
बांधाचीपायारुंदी (मी.) |
बांधाचीमाथारुंदी (मी.) |
बांधाचीउंची (मी.) |
बाजूउतार |
बांधाचाकाटछेद (चौ.मी.) |
बांधाचीलांबी (मी.) |
1 |
8ते 12 |
0.87 |
0.60 |
0.90 |
0.3:1 |
0.66 |
816 |
2 |
12ते 16 |
0.87 |
0.60 |
0.90 |
0.3:1 |
0.66 |
1126 |
3 |
16ते 20 |
0.87 |
0.60 |
0.90 |
0.3:1 |
0.66 |
1411 |
जागा निवडीचे निकष :-
जागा निवडीचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
- जमिनीचा उतार 8 ते 20 टक्के पर्यंत असावा.
- वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1250 मी.मी. पेक्षा जास्त असावे.
- जागा निवडताना मातीची खोली ही महत्वाची बाब आहे. निवडलेल्या क्षेत्रामध्ये मातीची
खोली व्यवस्थित असावी, जेणेकरुन सपाटीकरणासाठी माती अपुरी पडणार नाही.
- ज्या क्षेत्रात ही योजना राबवावयाची आहे, असे क्षेत्र अती उताराचे असल्याने बहुतांश
क्षेत्र हे पाणलोटाच्या वरील भागात असणार आहे व त्याचे जवळपास वन विभागाचे क्षेत्र
असण्याची शक्यता आहे. अनेकदा शेतकरी वनक्षेत्र लागवडीखाली आणतात किंवा
वनक्षेत्रात अतिक्रमण केले असण्याची शक्यता असते, असे क्षेत्र निवडू नये. तसेच
वनक्षेत्र व खाजगी वनालगत खालील बाजूस काम करतांना वरील क्षेत्रामधील माती
ढासळणार नाही तसेच झाडे-झुडपे, मोठे दगड-धोंडे पडून धुप वाढणार नाही याची दक्षता
घ्यावी. अशा क्षेत्रालगत योग्य तो बर्म सोडावा.
- जवळपासच्या नाला अगर ओघळीमधून खाचरांमध्ये पाणी घेण्याची सोय करता येईल
अशा जमिनी प्राधान्याने निवडल्या जातात.
- ज्या ठिकाणी अशा प्रकारची सोय करता येत नसेल व इतर सर्व निकष पूर्णत्वाने लागु होत असतील अशा ठिकाणी भातखाचरे जितक्या क्षेत्रांमध्ये पाडावयाची आहेत, त्याच्या कमीतकमी 5 पट वरील क्षेत्रांतील पाणी वळविण्याची सोय असेल अशा ठिकाणी जागा निवडीस प्राधान्य दिले जाते.
- दगडी बांधासाठी लागणारा पुरेसा दगड 100 मी. परिसरात उपलब्ध असणे आवश्यक
आहे.
पडकई कार्यक्रमातंर्गत मजगी योजना राबविण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पडीक क्षेत्राची सुधारणा करुन सदर क्षेत्र लागवडी खाली आणणे व भात पीकाखालील क्षेत्रात वाढ करुन भाताचे उत्पादन वाढविणे हा आहे. याकरिता पडकईसाठी क्षेत्र अत्यंत काळजीपूर्वक निवडले जाते. जेणेकरुन वरील सर्व कसोटया लागू होतील. असे उपलब्ध झालेल्या क्षेत्राचे सिमांकन गावाच्या नकाशावर भुमापन क्रमांकनिहाय केले जाते. पाणलोट विकास योजनेमध्ये सदरचे क्षेत्र समाविष्ठ केले जाते. त्यांनतर अशा क्षेत्रातील जे मालक आहेत त्यांची भेट घेऊन त्यांना पडकई योजनेचे उद्देश व योजना कशी राबविली जाईल याबाबतचे मार्गदर्शन केले जाते. अशा शेतकऱ्यांनी संम्मती दिले नंतर सदरचे क्षेत्र हे पडकई योजनेत घेतले जाते. या योजनेसाठी निवडलेल्या क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी मंडल कृषि अधिकारी यांनी समक्ष करुन सदर क्षेत्र योजनेसाठी योग्य असल्याबाबतचे तसेच क्षेत्राचा उतारगट कोणता आहे याबाबत प्रमाणपत्र दिले जाते. सदर क्षेत्राचे योजना राबविण्यापूर्वी व योजना राबविल्यानंतर सुस्पष्ट फोटो घेण्यात येतात व सदर फोटो तालुकास्तरावर फोटोचे जतन करण्यात येतात.
देखभाल :-
पुर्ण झालेल्या कामाची देखभाल करण्याची जबाबदारी लाभार्थीची असल्याने सदरची कामे नियमानुसार लाभार्थ्याकडे हस्तांतरित करण्यात येतात.