शेतीमित्र

जे जाणते शेतकरी त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक­-यांना देतील आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक­-यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतील, तसेच इतर व्यक्ती /संस्था ज्या स्वतः शेती करीत नाहीत किंवा ज्यांची स्वतःची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा शेतक-­यांना / व्यक्तींना / संस्थांना, त्याचप्रमाणे कृषि क्षेत्राशी संलग्न घरगुती उ'ोग उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उ'ोग, गांडुळशेती इत्यादीमधील वैशिष्टपुर्ण कामगिरी करणा-­या व्यक्ती तसेच खेडयांमधुन परसबाग वृध्दींगत करणा­-या महिला, कृषि विकास मंडळ ज्या गावात सक्रिय आहे. अशा मंडळाचे क्रियाशील सभासद / प्रमुख, इत्यादी व्यक्ती / संस्था / शेतकरी यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत सन १९९४ पासुन वसंतराव नाईक शेतीमित्र हा बहुमान प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी राज्यातून तीन जणांची (व्यक्ति अथवा संस्था) निवड करण्यात येते. या पुरस्काराचे प्रत्येकी रु. ३०,०००/- (रुपये तीस हजार मात्र) रोख रक्कम व स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र आणि त्या व्यक्तिचा सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समिती मार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड केलेल्या शेतक­-यास अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो.

सन २०१३ अखेर ६३ शेतीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.

सन २०११

  • श्री. संतोष काशिनाथ डुकरे, मु.पो.पारगाव (मंगरुळ), ता. जुन्नर, जि. पुणे
  • श्री. गणेश शिवप्रसाद फुंदे व्दारा- प्रकाशगिते, मातोश्री कोठारी वाटीका नं.४, मलकापूर रोड, अकोला.
  • श्री. आनंदा बाबूराव थोरात रा. ओंड, ता.कराड,जिल्हा सातारा
  • श्री. प्रशांत भानुदास पाटील मु. राडेवाडी, पो. अखोप त, जि.

सन २०१२

  • श्री.राहूल मनोहर खैरनार, मु.जय अंबिका कॉलनी, मालेगाव कॅम्प ता.मालेगाव जि.नाशिक
  • श्री .जितेंद्र रघुनाथ पाटील, मु.पो.ममुराबाद, ता.,जि.जळगाव मो.९०११०४७३२५
  • अ‍ॅड. बाळासाहेब जगन्नाथ बोठे-पाटील जिद्द बंगला, देना ब्ंॉक कॉलनी, प्रेमदान चौकाजवळ सावेडी रोड, अहमदनगर मो.९८५०९०१४१४
  • श्री. रावसाहेब बाळु पुजारी मु.पो तमदलगे ता. शिरोळ जिल्हा कोल्हापूर मो.९८८१७४७३२५
  • श्री. अतुल अविनाश कुलकर्णी, मु.पो.विडा ता. केज जि. बीड मो. ९४२२६३३३००

सन २०१३

  • श्री. हेमंत अंकुश सावंत मु.पो.हुंबरट, ता. कणकवली,जि.सिधुंदुर्ग
  • श्री. बाळकृष्ण पौलाद पाटील मु.पो.गणपूर, ता.चोपडा,जि.जळगाव
  • श्री. अशोक दगडु तुपे मु. कान्हेगाव., ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर
  • श्री. अमोल जयवंत जाधव मु. गोंदी. पो. शेरे, ता. कराड,जि. सातारा
  • श्री. चेतन मुकुंदराव भैरम मु.पो.ता.जि.भंडारा
  • श्री. ज्ञानेश्वर श्रीरंग रायते मु.पो.भवानीनगर, ता.इंदापूर,जि.पुणे मो.नं.९८८१७३६१२२
  • श्री. सदाशिव ऊर्फ सयाजीराव गोपाळराव पोखरकर मु.पो. कोतुळ, ता. अकोले, जि. अहमदनगर