राज्यातील इगवर्नन्स प्रकल्प

पर्जन्यमापन आणि विश्लेषण

http://maharain.gov.in

सदरचा प्रकल्प हा एसएमएसद्वारे दैनंदिन पावसाची आकडेवारी संकलित करून जनतेला माहिती उपलब्ध करून देण्यासाठी असून यामध्ये राज्यातील २०६५ महसूल मंडळांची पर्जन्यविषयक नोंदी तथा सरासरी व मागील वर्षाची तुलनात्मक माहिती पाहता येते. प्रत्येक महसूल मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसविले असून राज्यातील २०६५ राजस्व मंडळ अधिकारी पावसाची नोंद घेऊन एमएसद्वारे माहिती पाठवितात.

सन १९९७ पासूनची अद्यावत माहिती www.maharain.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध असून ती तुलनात्मक स्वरुपात भौगोलिक माहिती प्रणाली नकाशाद्वारे (GIS maps) राज्य, जिल्हा व तालुकानिहाय उपलब्ध आहे. विभागनिहाय राज्याचा नकाशा व मंडळ निहाय सर्व जिल्ह्यांच्या नकाशाद्वारे पावसाच्या तीव्रतेनुसार वेगवेगळ्या रंगनिर्देशकाप्रमाणे माहिती मिळते.

महारेन पोर्टलवरील माहिती स्टेट डाटा बँक पोर्टलवर (https://mahasdb.maharashtra.gov.in) सुध्दा उपलब्ध आहे.

पर्जन्यमापन व विश्लेषण या प्रणालीस Skoch Order of Merit 2014 पारितोषिक देवून गौरविण्यात आले आहेत.

ई-परवाना:- कृषि निविष्ठा परवाना व्यवस्थापन

http://mahaagriiqc.gov.in/

बियाणे, खते व किटकनाशके या कृषि निविष्ठाची विक्री व उत्पादन करण्यासाठी लागणारा परवाना सदर प्रणालीद्वारे ऑनलाईन प्राप्त होतो. तसेच यामध्ये प्रामुख्याने परवाना व्यवस्थापन, निविष्ठा तपशिल व विक्री अहवाल याबाबत माहिती आहे. निविष्ठा व्यवस्थापन कार्यवाही अंतर्गत नमुने काढण्यासाठी - ई-इन्सपेक्टर व नमुने तपासण्यासाठी - ई-लॅब या प्रणाली विकसित करण्यात येत आहेत.

ई-परवाना प्रणालीस Skoch Order of Merit 2013 आणि 2014, PSU पारितोषिक 2014, राज्य ई-गव्हर्नन्स पारितोषिक 2013, ई महाराष्ट्र पारितोषिक 2013 आणि ई-इंडिया पारितोषिक 2012 यांनी गौरविण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय उपअभियान प्रकल्पांतार्गत राज्याची ई-परवाना प्रणाली देशभर वापरासाठी निवडण्यात आलेली आहे.

ई-ठिबक

http://mahaethibak.gov.in

राष्ट्रीय सुक्ष्म सिंचन अभियान योजनेंतर्गत अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्याचे व्यासपीठ म्हणजेच ई-ठिबक होय. अर्जदाराच्या अर्जाची नियमाप्रमाणे छाननी करुन अनुदान शेतक-यांच्या खात्यावर अदा करण्यात येते.

अनुदानाचा अर्ज, सुक्ष्मसिंचन साहित्य व विक्रेता यांची निवड करण्यासाठी ई ठिबक हा सूकर/सोपा मार्ग आहे. शेतकरी अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन पाहू शकतात तसेच लाभार्थ्यींची यादी सुध्दा ऑनलाईनवर उपलब्ध आहे.

Skoch Order of Merit 2014 या पारितोषिताने ई ठिबक प्रणालीस गौरविण्यात आले आहे.

क्रॉपसॅप/ हॉर्टसॅप

http://www.ncipm.org.in/cropsap2014/login.aspx

पिकावरील किड अथवा रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत पिकाचे सर्वेक्षण करुन किड अथवा रोगांच्या प्रादुर्भावाबाबत शेतक-यांना उपाय योजना व सल्ला मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविला जातो, त्यासाठी केंद्र पुरस्कृत किसान एसएमएस सेवेचा वापर केला जात आहे.

क्रॉपवॉच

http://mahaagri.gov.in/cropwatch/asp/mlogin.asp

हंगामातील आठवडानिहाय पिक लागवडीखालील क्षेत्राची ऑनलाईन माहितीसाठी ही प्रणाली वापरली जाते. यामध्ये कृषि विभागामार्फत तालुकानिहाय लागवड क्षेत्राची माहिती/आकडेवारी संकलित केली जाते. त्यानुसार जिल्हा/तालुका/विभाग/राज्य निहाय पिक निहाय लागवडीचे क्षेत्र, मागील वर्ष व सरासरी तुलनात्मक आकडेवारी अहवाल संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

योजना अहवालासाठी ऑनलाईन MIS

विभागांतर्गत विविध कार्यान्वित योजनांच्या सनियंत्रनासाठी भौतिक व आर्थिक प्रगतीचे अहवाल online उपलब्ध होण्यासाठी सदरची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामध्ये क्षेत्रीय स्तरावरून साध्याची व लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्यात येते. त्यानुसार योजनानिहाय, घटकनिहाय राज्य ते तालुका अहवाल उपलब्ध होतील.