वनराई बंधारा

वनराई बंधारा

पावसाळी हंगाम संपल्यानंतर माहे ऑक्टोबरनंतर काही कालावधीपर्यंत ज्या नाले व ओढयामधुन पाण्याचा प्रवाह चालू असतो, अशा नाला/ओढयातील पाण्याचा प्रवाह पारंपारिक पध्दतीने आडवून पाण्याचा साठा करुन बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज काही अंशी भागविण्यासाठी उपलब्ध साधनांचा (सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू इ.) वापर करुन बांधलेला बांध म्हणजे वनराई बंधारा होय.

जागेची निवड

  • कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पाण्याचा साठा करणे शक्य होईल, अशी जागा वनराई बंधाऱ्यासाठी निवडली जाते.
  • नाला अरुंद व खोल असावा तसेच साठवण क्षमता पुरेशी असावी. नाल्याच्या तळाचा उतार 3 टक्के पेक्षा कमी असावा.
  • बंधाऱ्याची एकूण उंची 1.20 मी पेक्षा जास्त असू नये.
  • सर्वसाधारणपणे गाव/खेडे/वाडी यांच्याजवळ वनराई बंधारे असावेत. याकरिता पाणलोट क्षेत्राची अट नाही.

बांधकामाचा कालावधी

वनराई बंधाऱ्याच्या कामाचा कालावधी अल्प (7 ते 15 दिवस) असतो. पावसाळयानंतरचा प्रवाह विचारात घेऊन 15 ऑक्टोबरनंतर व साधारणपणे प्रवाह बंद होण्यापुर्वी तो अडविला जाईल या दृष्टीने कालावधी ठरविण्यात येतो. कारण या कालावधीमध्ये पूर येण्याची शक्यता कमी असून नालाच्या पात्रामध्ये पाण्याचा प्रवाह सुरु असतो.

वनराई बंधा-याचे संकल्पचित्र

1.755 चौरस मीटर छेदाचे बांधाकरीता, 10 मिटर लांबीकरीता बांधाची आकृती व लागणारी पोती