कृषिरत्न

समाज विकासाची गंगा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असणारे महाराष्ट्राचे थोर कृषि शास्त्रज्ञ डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषि, शिक्षण व सहकार या तिन्ही क्षेत्रांमध्ये केलेले अलौकिक कार्य महाराष्ट्र राज्याला व देशाला वंदनीय तसेच अभिमानास्पद आहे. त्यांचे कृषि व संलग्न क्षेत्रातील कार्याला अभिवादन म्हणुन त्यांच्या १०१ व्या जयंतीचे निमित्त साधुन सन २०००-२००१ सालापासुन राज्यातील कृषी क्षेत्रातील कृषि विस्तार, कृषि प्रक्रीया, निर्यात, कृषि उत्पादन, पीक फेरबदल, कृषि उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी मध्ये अति उल्लेखनिय कार्य करणा­-या राज्यातील कोणत्याही एका शेतक­-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत सन २०००-२००१ पासुन '' डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार '' देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी दरवर्षी राज्यातून प्रगतीशील शेतक­-यांचे प्रस्ताव कृषि आयुक्तालयामार्फत मागविण्यात येऊन ''वसंतराव नाईक कृषिभुषण'' पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समिती मार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड केलेल्या शेतक-­यास अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारासाठी निवड होणार्‍­या एका व्यक्तीस अथवा संस्थेस रुपये ७५,०००/- (रु. पंच्याहत्तर हजार फक्त) एवढया रोख रक्कमेचे पारितोषिक, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप असुन, पुरस्कार विजेत्या व्यक्तीच्या (शेतक­-याच्या) पत्नीचा साडी चोळी, कोयरी व पतीस शाल देऊन मा. राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात येते. सन २०१३ अखेर १६ कृषिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.

सन २०११

  • 1. श्री. भैरवनाथ भगवानराव ठोंबरे मु. रांजणी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद
  • 2. श्री. आनंद रामचंद्र कोठाडिया मु.पो. जेऊर (वादळ बंगला)ता. करमाळा जि. सोलापूर

सन २०१२

  • वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, श्रीमती.वत्सलाबाई नाईक महिला महाविदयालयासमोर पुसद, जि. यवतमाळ

सन २०१३

  • श्री. अनिल घमाजी मेहेर मु. वारुळवाडी, पो. नारायणगाव,ता. जुन्नर, जि. पुणे
  • 2. प्रवरा इन्स्टिटयूट ऑफ रिसर्च अ‍ॅन्ड एज्युकेशन इन नॅचरल अ‍ॅन्ड सोशल सायन्सेस (पायरेन्स) लोणी, ता.राहता, जि. अहमदनगर अध्यक्ष - श्री.मुरलीधर म्हाळू पुलाटे