शेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती
पाणलोट क्षेत्राची पाहणी करीत असताना ज्या शेतात बांधाची फूट तूट झाली आहे किंवा मोठया प्रमाणात बांधाला घळी पडल्या आहेत, अशा सर्वच क्षेत्राची पाहणी करुन फुटतुटीची नोंद गावच्या सर्व्हे नंबर असलेल्या नकाशावर करावी. ज्या ठिकाणी फुटतूट लहान आहे, अशा ठिकाणी खस गवताची एक ओळ लावावी. ज्या ठिकाणी फुटतून मोठी आहे अशा ठिकाणी आजूबाजूचे दगडगोटे त्या फुटलेल्या बांधात टाकावेत. त्याच्यावर एक खस गवताची ओळ लावावी.